सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

"खजाना कसा काय भरायचा ?"

एकदा अकबर बादशहाच्या सैन्याची फार दिवस लढाई चालू होती.युद्धामुळे शाही खजाना संपत आला होता. राजाने बिरबलला विचारलं, "खजाना कसा काय भरायचा ?." बिरबल: तुम्हाला धन्ना सेठ (व्यापारी) कडून खजाना मिळू शकतो. अकबराला आश्चर्य वाटले की एखाद्या व्यापाऱ्याकडे एवढे धन कसे असू शकते,तरी तो धन्ना सेठकडे गेला. धन्ना सेठ: बादशहा ! माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे,तुम्हाला हवं एवढं धन तुम्ही घेऊन जा. अकबर: सेठ ! मी तुम्हाला शिक्षा करणार नाही,फक्त मला सांगा कि तुम्ही एवढी संपत्ती कशी जमविली ? धन्ना: मी धान्यात आणि मसाल्यात भेसळ करून ही माया जमविली. अकबराला राग आला,त्याने धन्नाची सर्व संपत्ती जप्त केली आणि त्याला शाही घोड्यांच्या तबेल्यात घोड्याची लीद उचलायची शिक्षा दिली.धन्नाने ती मान्य केली.        बरीच वर्षे निघून गेली.बादशहा अकबराला परत अशा दीर्घ युद्धाला तोंड द्यावे लागले आणि खजाना लवकर रिता झाला.बिरबलाने परत धन्ना सेठ कडे मदत मागायचा सल्ला दिला. अकबराला आश्चर्य वाटले : बिरबल अरे मी त्याला घोड्याची लीद उचलायचे काम दिलं आहे,त्याच्याकडे कसली आलीय संपत्ती ? बिरबल: बादशहा ! तुम्ही त्याला

‘‘पण त्या पैशाचं मी करू काय?’’

एक अमेरिकन माणूस मेक्सिकोत सुटीवर जातो. एका छोट्या शांत गावात. गावात एक सुंदर झुळझुळती नदी असते. त्यात एक तरुण नावाडी रोज दिसतो. मासेमारी करत असतो. शांत बसलेला असतो. एका दुपारी अमेरिकन त्या तरुणाला विचारतो, ‘‘हे इतके सुंदर मासे पकडायला तुला किती वेळ लागला?’’ तो मुलगा म्हणतो, ‘‘लागले असतील काही तास.’’ ‘‘पण मग तू रोज काहीच तास का काम करतोस. जास्त काम कर, जास्त मासे पकड.’’ - अमेरिकन त्याला सांगतो. ‘‘पण हे एवढे मासे पुरेत. माझं आणि माझ्या घरच्यांचं भागेल तेवढय़ात, मग जास्त पकडून काय करू?’’ - तो तरुण विचारतो. ‘‘ते ठीक आहे, पण बाकीच्या वेळेचं तू करतोस काय?’’ ‘‘मी मस्त झोप काढतो. माझं छोटं मूल आहे, त्याच्याशी खेळतो. बायकोबरोबर फिरायला जातो, गप्पा मारतो. गावात चक्कर मारतो. मित्रांना भेटतो. मस्त गप्पा होतात. सुख-दु:ख समजतात. कधीकधी मी गिटार वाजवतो, गातो. चांदणं पाहतो.’’ हे सगळं ऐकून अमेरिकन वैतागतो. म्हणतो, ‘‘माझ्याकडे बघ, मी हार्वर्डमधून एमबीए केलं आहे. मी उत्तम बिझनेस मॉडेल बनवून देऊ शकतो. मी तुलाही एक मॉडेल बनवून देतो. एकदम फुकटात. फक्त तुला रोज सकाळी लवकर मासेमारीला

एकदा "BST" मध्ये प्रवास करतांना

..... एकदा "BST" मध्ये प्रवास करतांना एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली CONDUCTOR च्या सीट वर ती कोप-यात एकटीच होती बसली मोकळी जागा पाहुन मी माझी "तशरिफ" तेथेच ठेवली मला पाहताक्षणीच तिने आपली पर्सच उचलुन ठेवली उघडया खिडकितुन वारा तसा फ़ारच जोरात येत होता तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर हळुवार उडवीत होता ती मात्र ओढनी सावरत सावरत स्वत:शीच गुनगुनत होती नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी मला हाथभार लावत होती तेवढ्यात बसच्या धक्क्याने आमच्या दोघांतील अंतर कमी केले एका मिनीटासाठी का होईना मला स्वप्नाच्या दुणियेत नेले येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी ती तीची PURSE सावरायला लागली गर्दित मला खेटत खेटत स्वत:ची वाट काढु लागली खाली उतरताच माझी नजर एकटक तिला शोधु लागली ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन केव्हाचीच हवेशी बोलु लागली आमच्या महालात रानीची जागा नेहमी अशीच खाली असते आम्हाला आवडलेली रानी जेव्हा तेव्

एकच चहा, तो पण कटींग...

एकच चहा, तो पण कटींग... एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री... एकच साद, ती पण मनापासुन... अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून एकच कटाक्श, तो पण हळूच... एकच होकार, तो पण लाजून... एकच स्पर्श, तो पण थरथरून... अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून... एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून... एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून... अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून... एकच गरम पोळी, ती पण तूप लावून... एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून.. अजुन काय हवे असते आपल्या आईकडून. एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन... एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून... एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून... अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून... स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन... फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन.. अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून...............