एकदा अकबर बादशहाच्या सैन्याची फार दिवस लढाई चालू होती.युद्धामुळे शाही खजाना संपत आला होता. राजाने बिरबलला विचारलं, "खजाना कसा काय भरायचा ?." बिरबल: तुम्हाला धन्ना सेठ (व्यापारी) कडून खजाना मिळू शकतो. अकबराला आश्चर्य वाटले की एखाद्या व्यापाऱ्याकडे एवढे धन कसे असू शकते,तरी तो धन्ना सेठकडे गेला. धन्ना सेठ: बादशहा ! माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे,तुम्हाला हवं एवढं धन तुम्ही घेऊन जा. अकबर: सेठ ! मी तुम्हाला शिक्षा करणार नाही,फक्त मला सांगा कि तुम्ही एवढी संपत्ती कशी जमविली ? धन्ना: मी धान्यात आणि मसाल्यात भेसळ करून ही माया जमविली. अकबराला राग आला,त्याने धन्नाची सर्व संपत्ती जप्त केली आणि त्याला शाही घोड्यांच्या तबेल्यात घोड्याची लीद उचलायची शिक्षा दिली.धन्नाने ती मान्य केली. बरीच वर्षे निघून गेली.बादशहा अकबराला परत अशा दीर्घ युद्धाला तोंड द्यावे लागले आणि खजाना लवकर रिता झाला.बिरबलाने परत धन्ना सेठ कडे मदत मागायचा सल्ला दिला. अकबराला आश्चर्य वाटले : बिरबल अरे मी त्याला घोड्याची लीद उचलायचे काम दिलं आहे,त्याच्याकडे कसली आलीय संपत्ती ? बिरबल: बादश...
A Hindi blog about computer and Mobile Technology