अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास

एका शिक्षिकेने
अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात
धरला आणि सर्व
विद्यार्थ्यांवरएक नजर टाकली.
प्रत्येकाला वाटले
की आता मॅडम विचारतील की हा ग्लास
भरलेला आहे
की रिकामा ?
पण
एक स्मित हास्य करुन मॅडम ने
प्रश्न
केला, "या ग्लासचं वजन किती असेल कुणी सांगेल
का ?"
कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी200 ग्रॅम . एक जण तर
म्हणाला - मॅडम, अर्धा किलो ! मॅडम ने
पुन्हा एकदा स्मित
हास्य करुन बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन
मोजमाप
करुन सांगितल्याने फारसा फरक पडणार नाही !
मुळात वजन
काहिही असो, जर का मी हा ग्लास एक
मिनीट असाच धरुन
ठेवला तर मला काही त्रास होणार नाही . एक
तास धरुन
ठेवला तर हात दुखेल . आणि दिवस भर असाच
ठेवला तर ... ? तर हात खुप जड होईल,
ईतका की बधीर
होउन निकामीच ह्वावा ...
आपल्या आयुष्यातील तणाव अन्
चिंतांच पण असंच असतं . क्षण भर विचार करा ,
काही वाटणार नाही . पण मनात धरुन बसाल
तर ... तुमचं मन
पण असंच जड होत होत बधिर होईल ! ईतकं
की तुम्ही काही करुच शकणार नाहीत !
तेव्हा व्यर्थ
चिंता करणं सोडा .
मनाला हलकं करा .
आणि निरंतर
अल्हाद दायक जिवन जगायला शिका ... आयुष्य
खुप सुंदर आहे .....!
आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:
पहिली - जे आवडते ते मिळवायला शिका.
दुसरी - जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.
नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसूनका.....
असे करून स्वतःची किंमत कमी होते.
एक नेहमी लक्षात असू द्या,
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत....
चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक
आहेत...
चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून
राहतात...

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

इनपुट, आऊटपुट और सीपीयु

कम्प्यूटर के विभिन्न भाग

The Lion and the Mouse